Welcome User !!! Coming Soon !! Register | Login
 
 
दिनांक: १२/०२/२०१०
मित्रहो,
नमस्कार,

पुढे आपणासाठी रोजगारविषयक माहिती दिली आहे. पक्षाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्कात असलेल्या सुधीर पाटील यांनी ही माहिती संकलित करून पाठवली. सदर माहिती अधिकाधिक मराठी तरुण-तरुणींना नोकरी मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. शक्य / योग्य त्या पदासाठी अर्ज करा, मुलाखती द्या, तसेच याबाबत इतरांनाही सांगा.

आपणास शुभेच्छा !
संकेतस्थळावरील इतर विभागांतील मजकूरही अवश्य वाचा.
धन्यवाद.

जय महाराष्ट्र !
मनसे संकेतस्थळ प्रतिसाद कक्ष.
 
रोजगारविषयक माहिती
शासनाच्या विविध विभागांत, कार्यालयांत, अनेक बॅंकांत उपलब्ध असलेल्या नोक-यांचा तपशील
 
ठाणे पोलीस दलात शिपाई पदाच्या ६७० जागा
महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती अंतर्गत ठाणे शहर पोलीस दलात पोलीस शिपाई (६६८ जागा), बँडसमन (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती दि. ८ मार्च २०१० रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे शहर येथे होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ६२ जागांसाठी परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील अधिव्याख्याता (६२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

नाशिक जिल्हा न्यायालयात २२० जागा
नाशिक जिल्हा न्यायालयात लघुलेखक-निम्न श्रेणी (२२ जागा), कनिष्ठ लिपिक (५४ जागा), शिपाई (१८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमत आवृत्तीत दि. २५ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

बेस्टमध्ये प्रशिक्षणार्थी तारतंत्रीच्या ३३ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) प्रशिक्षणार्थी तारतंत्री (३३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २८ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञाच्या ११ जागा
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ (११ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.nplindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी व लिपिकाच्या १२५५ जागा
पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी- स्थापत्य अभियंता (४ जागा), अधिकारी- इलेक्ट्रिकल अभियंता (३ जागा), अधिकारी-आर्किक्टेक्चर (२ जागा), लिपिक (१२४६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://pnbindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सशस्त्र सीमा बलमध्ये खेळाडूंसाठी १४२ जागा
सशस्त्र सीमा बलमध्ये खेळाडूंसाठी कॉन्स्टेबल-पुरुष (१४० जागा), कॉन्स्टेबल-स्त्री (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. अर्ज व अधिक माहिती http://www.ssb.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

इंडियन ऑईल कार्पोरेशनध्ये अपंगांसाठी ४ जागा
इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये अपंगांसाठीच्या विशेष भरती मोहिमेअतंर्गत लॅब अनॉलिस्ट (१ जागा), मटेरियल असिस्टंट (२ जागा), असिस्टंट केमिस्ट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.iocl.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये सुरक्षा रक्षकाच्या ३१९ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात सुरक्षा रक्षक (३१९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. सविस्तर जाहिरात दै. लोकमत व सामनामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पंजाब अँड सिंध बँकेत अधिकार्याच्या ५६५ जागा
पंजाब अँड सिंध बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (५०० जागा), तांत्रिक अधिकारी (५ जागा), चार्टर्ड अकाउंटंट (२५ जागा), ईडीपी ऑफिसर (३५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.psbindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पंजाब अँड सिंध बँकेत लिपिका -नि- रोखपालच्या २५० जागा
पंजाब अँड सिंध बँकेत लिपिक-नि-रोखपाल (२५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.psbindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये ३३ जागा
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये शास्त्रज्ञ (३३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०१० आहे. अधिक माहिती http://www.iictindia.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय सैन्य दलात विधी पदवीधरांसाठी १३ जागा
भारतीय सैन्य दलात विधी पदवीधरांसाठी पुरुषांच्या ६ जागा व महिलांच्या ७ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज २० फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती www.indianarmy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

पुण्याच्या एफटीआयआयमध्ये ९ जागा
पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्सिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रोफेसर साऊंड इंजिनिअर (१ जागा), असिस्टंट प्रोफेसर टिव्ही ग्राफिक (१ जागा), लेक्चरर टिव्ही ग्राफिक (१ जागा), लेक्चरर आर्ट डायरेक्टर (१ जागा), लेक्चरर साऊंड इंजिनिअर (१ जागा), ग्रंथपाल (१ जागा), सहायक सुरक्षा अधिकारी (१ जागा), डेमोस्ट्रेटर-साऊंड रेकॉर्डिंग (१ जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ डिसेंबर २००९ - १ जानेवारी २०१०च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये १ जागा
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये सहायक संचालक - जनसंपर्क (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ डिसेंबर २००९ - १ जानेवारी २०१०च्या अंकात आली आहे.
 
 
 
Post Your Comments
     
*Name:  
     
*Email ID:  
     
*Comment:  
     
      
 
Fields marked * are compulsary
 
Your clicking on Submit confirms your acceptance of our Terms & Conditions
 
 
 
A Glance
 
Raj Thakrey's Dombivli Sabha
   
   
   
   
   
   
   
 
 
Follow us on
 
   
 
 
Advertise with us | Privacy Policy | Disclaimer | About Us | Contact Us | Feedback
Copyright © AAMCHA KALYAN . All rights reserved.2009